Last Updated on 27 Oct 2024 7:58 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये फक्त चार उमेदवारांच्या नावाची घोषणी केली गेली आहे. शनिवारी सकाळीच ठाकरे गटाची दुसरी १५ उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात आली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार दहिसरमधून विनोद घोसाळकर, विलेपार्लेतून माजी नगरसेवक संदीप नाईक, वर्सोव्यातून हरुन खान आणि घाटकोपर पश्चिमेतून संजय भालेराव यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा ……………………………………………………….
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; ‘या’ चेहऱ्यांना संधी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीत ६५, दुसऱ्या यादीत 1१५ तर तिसऱ्या यादीत आज चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून आतापर्यंत एकूण ८४ उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला राज्यात प्रचंड पाठिंबा मिळत असताना तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९० जागांचे वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.












































































