Last Updated on 07 Sep 2023 10:25 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितात. केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभवातून जगण्याची कला शिकवितात,आयुष्याची कोरी पाटी ज्ञानाने समृद्ध करतात तेच शिक्षक असतात.असे प्रतिपादन परळ,मुंबई येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार कांबळे यांनी केले.
महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.5 सप्टेंबर ‘शिक्षक दिन ‘ हा दिवस शिक्षकांविषयी आदर,प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.याच दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज एक दिवसासाठी शिक्षकाची जबाबदारी पार पाडली.
हा शिकविणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वेगळा अनुभव होता.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगतांचा कार्यक्रम पार पडला.विद्यार्थ्यांनी स्वलिखित तयार केलेले शुभेच्छा पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य आणि प्राध्यापकांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी नाचरे तर आभार प्रदर्शन रोशनी तांबे या विद्यार्थिनीने केले.

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करा
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
डेंग्यू : लक्षणे आणि औषधोपचार
विविध कार्यकारी सोसायट्यांना करता येणार ‘हे’ उद्योग,व्यवसाय; जाणून घ्या
चला पर्यटनाला | निसर्गाचं वरदान : ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट’ बहे
![]()






































































