Last Updated on 22 Jul 2024 4:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 60.43 (105.25), धोम 6.22 (13.50), कन्हेर 5.57 (10.10), वारणा 26.81 (34.40), दूधगंगा 15.63 (25.40), राधानगरी 6.91 (8.36), तुळशी 2.48 (3.47), कासारी 1.99 (2.77), पाटगांव 3.19 (3.72), धोम बलकवडी 1.78 (4.08), उरमोडी 3.66 (9.97), तारळी 3.16 (5.85), अलमट्टी 93.81 (123).
हेही वाचा – कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; ‘इतका’ टीएमसी झाला पाणीसाठा
कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 592 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 23.9 (40) व अंकली पूल हरिपूर 26.6 (45.11).











































































