Last Updated on 20 May 2024 9:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लोकसभेच्या पाचव्या आणि राज्यातल्या अंतिम टप्प्यात मुंबईतल्या सहा, महानगर क्षेत्रातल्या चार आणि नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा तेरा जागांसाठी मतदान झाले.उत्तर मुंबई,वायव्य मुंबई,ईशान्य मुंबई,उत्तर मध्य मुंबई,दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मुंबईतल्या सहा मतदारसंघांसह ठाणे,कल्याण,भिवंडी,पालघर,नाशिक,दिंडोरी आणि धुळे या तेरा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची लढत कॉंग्रेसच्या भूषण पाटील यांच्याशी तर उत्तर पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे रविन्द्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांच्यात लढत आहे.
उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात यंदा भाजपानं प्रख्यात विधीज्ञ उज्वल निकम यांना मैदानात उतरवलं आहे तर कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड त्यांच्यासमोर आहेत . दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई अशी थेट लढत आहे.
दक्षिण मुंबई मतदार संघात शिवसेनेच्या यामिनी जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्याबरोबर सामना होत असून ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहीर कोटेचा यांची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांच्यासोबत आहे.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा 
ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे, कल्याण मतदार संघात शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर,
भिवंडीत भाजपाचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे.
पालघर मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कामडी, भाजपाचे डॉ हेमंत सावरा आणि बविआचे राजेश पाटील असा तिरंगी सामना आहे.
दिंडोरीमधे भाजपाच्या डॉ भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे, धुळ्यात भाजपाचे डॉ सुभाष भामरे विरुद्ध कॉंग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव यांच्यात थेट तर नाशिकमधे शिवसेनेचे हेंमत गोडसे, शिवसेना उबाठाचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष शांतीगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत आहे.












































































