Last Updated on 06 Mar 2025 1:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
ग्राहकांसाठी प्रीपेड नव्हे, तर पोस्टपेड इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार!
मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले,इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 30 Oct 2026 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit बाह्यरुग्ण तपासणीसह घरभेटी, टेलिमेडिसिन आणि १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्यांवर भर मुंबई | राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार,... Read more













































































