Last Updated on 15 Jul 2024 10:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे.त्याचबरोबर कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसानेत्यामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत.कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर सांगलीतील एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटाने वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी 18 फुटांवर पोहचली आहे.बहे येथील कृष्णा नदीवरील बहे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा – अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती : काय करावे आणि काय करु नये…
कोयना धरण तसेच कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस पडत आहे.त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात 274 मिलिमिटर पावसाची नोंद
कोयना धरणातील पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.कोयना धरणातील पाणी साठ्यात गेल्या 24 तासात 4 टीएमसीने पाणी वाढले आहे. धरणात प्रतिसेकंदाला 48 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. 105 टीएमसीच्या कोयना धरणात 40.43 टीएमसी पाणी साठा वाढला आहे. पावासामुळे अनेक छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत.मुसळधार पावसामुळे परिसरातील जुना संगमनगर पुलही पाण्याखाली गेला आहे.
त्याचबरोबर,रविवारी सायंकाळी कृष्णा नदीवरील बहे पुलाजवळील बंधारा पाण्याखाली गेला आहे.गेल्या महिन्यातही काही काळासाठी बंधारा पाण्याखाली गेला होता.या बंधाऱ्यावरूनच रामलिंग बेटावर जावे लागते.बंधारा पाण्याखाली गेल्याने भाविक पर्यटकांना आता बेटावर जाता येणार नाही.









































































