Last Updated on 26 Jan 2025 10:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता.वाळवा) येथील विशाळी यात्रा यंदा २९ व ३० जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बुधवारी (२९ ला) पौष अमावस्येला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे.
बहे (ता.वाळवा) येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या रामलिंग बेटावर विशाळी यात्रा तसेच रामनवमी व हनुमान जयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे होत असतात.यंदा २९ व ३० जानेवारी रोजी विशाळी यात्रा होत आहे. ही यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. प्रसिध्द तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या रामलिंग बेटावर पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
हेही वाचा – बहे येथे समाज प्रबोधन मंडळाच्या वतीने २९ जानेवारी रोजी भजनी स्पर्धां
बुधवारी पहाटे अभिषेक, पुजा-अर्चा,धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले राहील. या यात्रेत खेळणी, मिठाई, खाद्य पदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात येत असतात. गेली गेली अनेक वर्षे यात्रा मोठ्या उत्साहात होत असल्याने भाविकांनी दर्शनाचा व यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन बहे ग्रामपंचायत, रामलिंग बेट देवस्थान समिती व बडवे-पुजारी यांनी केले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्... Read more












































































