Last Updated on 17 Sep 2023 5:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
एस.डी.पाटील पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा : सभासदांना 13 टक्के लाभांश देण्याचा निर्णय
सांगली । छोट्या-छोट्या पतसंस्थानी समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे. अर्थव्यवस्था मजबूत ठेवाण्यात या पतसंस्थाचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा प्रा.सौ.अरूणादेवी पाटील यांनी केले.

इस्लामपूर येथील एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या 37 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होते. पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची सभा संपन्न झाली.सभासदांना 13 टक्के लाभांश देण्याचा निर्णय या सभेत झाला.
माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. अरूणादेवी पाटील म्हणाल्या,’संस्थांच्या वाढीसाठी सर्व घटकांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असतो. ठरावीक टप्पा ओलांडल्यावर पतसंस्थेने बदलत्या नवनवीन धोरणांचा अवलंब करावा आणि बदल करण्याची भुमिका स्विकारावी. एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने घालून दिलेला पायंडा असाच पुढे सुरू रहावा.
पतसंस्थेचे चेअरमन, प्रकाश बनसोडे म्हणाले,‘पतसंस्थेने संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना 13 टक्के लाभांष देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्पर्धेत टिकण्यासाठी पतसंस्थाना कसरत करावी लागत आहे. एस. डी. पाटील पतसंस्थेने व्याजदर कमी करून तो साडेनऊ टक्के करण्यात आला आहे. सभासदांना भेटवस्तू देण्याचा निर्णय या सभेत झाला.
![]()
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ : शास्त्र काय सांगते?…जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
![]()
पतसंस्थेचे संस्थापक व वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव बी. एस. पाटील यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.संचालक प्राचार्य डॉ. ए.एम.जाधव यांनी स्वागत केले.व्हा. चेअरमन उत्तम शिनगारे यांनी अहवाल वाचन केले.प्रा. मकरंद बडवे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले.सुजय यादव यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले.प्रा.संदिप सानप यांनी दोष दुरुस्ती अहवालाचे वाचन केले.प्रा. शाहू पाटील यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले.सुजय यादव यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले.यशवंत जाधव यांनी लेखा परीक्षक नियुक्तीचा ठराव मांडला.

या सभेत सभासद पाल्यांना प्रमाणपत्र,शिल्ड आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.सेवानिवृत्त सभासद व नव्याने झालेल्या शाखाप्रमुख व विशेष प्राविण्यप्राप्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ. अंकूश बेलवटकर,प्राचार्य डॉ. जे. जी मुलाणी,प्राचार्य राम शिंदे,प्राचार्य, ए. एम. पाटील,मुख्याध्यापक एस.एल.पाटील,मुख्याध्यापिका इरफाना संदे उपस्थित होत्या.प्रा.संदीप सानप यांनी सूत्रसंचालन केले.सचिव सुभाष नांगरे,एस.पी.दळवी,रेष्मा मदने,नितीन कुटे,अतूल पाटील,सचिन कांबळे यांनी संयोजन केले.सुजय यादव यांनी आभार मानले.
![]()












































































