Last Updated on 04 Nov 2023 3:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर दर्शवली सकारात्मकता
मुंबई । सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनातील मागणी अशी : सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कमी पर्जन्यमान असलेला तालुका आहे.याही वर्षी या तालुक्यामध्ये खूप कमी पाऊस पडलेला आहे.काही भागात तर अजिबातच पाऊस पडलेला नाही.विस्ताराने हा तालुका मोठा तालुका आहे.या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी डाळींब द्राक्ष पीक घेण्यात आलेली आहेत.जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील भविष्यात आवासून उभा राहणार आहे.म्हैसाळ योजनेतील पाणी हे जत तालुक्यातील बहुतांश गावांना मिळत नाही.ती गावे पिण्याच्या पाण्यापासून तसेच शेतीच्या पाण्यापासून आजही वंचित आहेत.त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे सदर गावे दुष्काळग्रस्त यादीमध्ये घेण्याची आवश्यकता आहे.तसेच सदर भागात दुष्काळ जाहीर न केल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालेला दिसून येत आहे.तरी, आपल्या स्तरावर तातडीने “जत तालुका” दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा.













































































