Last Updated on 26 Oct 2024 11:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. एकूण १६ जणांची यादी आहे. या यादीमध्ये काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील दोन जागांसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीत काँग्रेसने ४८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत काँग्रेसने २३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तर आता काँग्रेसने या यादीत १६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसने ८७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसने शनिवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे यांनाही दिग्रसमधून संधी मिळाली आहे. तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, वांद्रे पश्चिममधून आसिफ झकारिया यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर याना उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेसची तिसरी यादी
खामगाव-दिलीपकुमार राणा, मेळघाट-हेमंत चिमोटे, गडचिरोली-मनोहर पोरेटी, दिग्रस-माणिकराव ठाकरे, नांदेड दक्षिण-मोहनराव अंबाडे, देगलूर-निवृत्तराव कांबळे, मुखेड- हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, मालेगवा-मध्य एजाज बेग अजीज बेग, चांदवड-शिरीषकुमार कोतवाल, इगतपुरी-लकीभाऊ जाधव, भिवंडी पश्चिम-दयानंद चोरघे, अंधेरी पश्चिम-सचिन सावंत, वांद्रे पश्चिम-असिफ झकेरिया, तुळजापूर-कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील, कोल्हापूर उत्तर-राजेश लाटकर, सांगली-पृथ्वीराज पाटील
![]()

विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, वाचा संपूर्ण यादी
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
![]()
काँग्रेसची तिसरी यादी
खामगाव – राणा दिलीपकुमार सानंदा
मेळघाट- डॉ. हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली – मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
नांदेड साऊथ – मनोहर अंबाडे
देगलूर – निवृत्तीराव कांबळे
मुखेड – हनमंतराव पाटील
मालेगाव मध्य -एजाज बेग अली बेग
चांदवड – शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी – लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम – दयानंद चोरगे
अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
वांद्रे पश्चिम – असिफ झकारिया
तुळजापूर – कुलदीप थिरज अप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर
सांगली – पृथ्वीराज पाटील













































































