Last Updated on 06 Nov 2024 12:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील.
या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या जाहीरनाम्यात आपला पक्ष जनतेला उन्नतीसाठी गॅरंटी देणार आहे. आज विविध क्षेत्रात मागे पडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा अग्रेसर करण्यासाठी आपण पाच गॅरंटी जनतेसमोर देणार आहोत, असं विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.
तत्पूर्वी राहुल गांधी आज दुपारी नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.













































































