Last Updated on 13 Feb 2025 10:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : सहकारी साखर कारखान्यांसाठी नव्या कार्यकारी संचालकांचे (एमडी) पॅनल तयार करण्यासाठी झालेल्या परीक्षेत किल्लेमछिंद्रगड (ता. वाळवा) येथील हणमंतराव विठ्ठलराव पाटील हे ५० पैकी ७ व्या रँक मध्ये उतीर्ण झाले. पाटील हे सध्या गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स येथे जनरल मॅनेजर फायनान्स या पदावर कार्यरत आहेत.
पाटील यांनी यापूर्वी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज, कृषी विज्ञान केंद्र बारामती, राजारामबापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इस्लामपूर येथे चीफ अकाउंट्स ऑफिसर म्हणून तसेच संजय घोडावत इंजिनीरिंग कॉलेज, केन ऍग्रो एनर्जी रायगाव, गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी येथे काम केले आहे. पाटील हे एम. कॉम, जी.डी. सी. अँड ए, सी.ए (इंटर) आहेत. कृष्णा कारखान्याचे सेवानिवृत्त चीफ अकाऊंटंट स्व. विठ्ठलराव पाटील यांचे ते सुपुत्र आहेत.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक पदाच्या नियुक्तीसाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया झाली. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणांची अट होती. त्यात ७४ उमेदवार बसले आहेत. मात्र पॅनल ५० जणांचेच होणार आहे. पहिला उमेदवार ६० टक्क्यांचा, तर ५० वा उमेदवार ३८.८३ टक्क्यांचा आहे.
कार्यकारी संचालकांचे पॅनल तयार करण्यासाठी सहकार विभागाने एप्रिल २०२२ मध्ये आदेश जारी केला होता. त्यानंतर मे २०२२ मध्ये साखर आयुक्तालयाने सविस्तर परीपत्रक जारी केले होते. तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेत पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये परीक्षा पद्धती तयार केली. मात्र, मौखिक चाचणी परीक्षेवेळी लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते. आव्हान याचिका फेटाळण्यात आल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण ७४ जण उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, त्यातील ५० जणांनाच कार्यकारी संचालक तालिकेत (एमडी पॅनल) स्थान मिळणार आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 11 Jul 2026 9:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत वृक्षारोपण उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती कराड । कृष्णा विश्व विद्यापीठाने पुढाकार घेत वनविभ... Read more













































































