Last Updated on 30 Oct 2023 9:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वाळवा तालुक्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यांना पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने सायंकाळी इस्लामपूर शहरात ‘कँडल मार्च’ काढण्यात आला.यावेळी मराठा बांधवांसह महिला भगिनीही सहभागी झाल्या होत्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे.वाळवा तालुक्यातही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.(सोमवारी) सायंकाळी 6 वाजता मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुका व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्यावतीने इस्लामपूर शहरामध्ये वाळवा पंचायत समिती,क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत (तहसिल कार्यालय) पर्यंत ‘कँडल मार्च’ काढण्यात आला.
हेही वाचा – राजू शेट्टींची पदयात्रा स्थगित, मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा

इस्लामपूर शहरातील वाळवा पंचायत समिती- झरी नाका-आझाद चौक- संभाजी चौक- गांधी चौक- यलम्मा चौक – छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असा ‘कँडल मार्च’ काढण्यात आला.

बी.जी.पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरु

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बी.जी.पाटील यांनी आज सकाळी इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या वतीने त्याच ठिकाणी साखळी उपोषण सदर उपोषण करण्यात येणार आहे.हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयापर्यंत सुरु राहणार आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी बी.जी.पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरु












































































