Last Updated on 19 Dec 2023 7:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलने सायबर स्क्वेअर टीम व एच .के .स्कूल ट्रेंझ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील पहिला डिजिटल फेस्टचे प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले.आधुनिक जगातील प्रगत कौशल्याचा वापर तसेच डिजिटल शिक्षण प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध विद्यार्थ्यांनी वर्किंग मॉडेल,विविध प्रतिकृती,विविध माहितीपट,वेब डेव्हलपमेंट,ॲनिमेशन,ग्राफिक डिझाईन अशा विविध उपकरणांचे तसेच माहितीचे प्रदर्शन यामध्ये करण्यात आले.
जुन्या ते नवीन साहित्यांच्या रचनेत कसा बदल झाला व त्या बदल झालेल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले होते.

उद्घाटन प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सौ.सुनिता निशिकांत भोसले –पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांनी बदललेल्या डिजिटल तंत्रज्ञानाचा व प्रगत कौशल्याचा वापर आपल्या देशासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी केला पाहिजे असे अध्यक्षा सौ .सुनिता निशिकांत भोसले -पाटील म्हणाल्या.

कार्यक्रमासाठी RIT आय. टी विभागाचे प्रमुख डॉ अमोल आडमुठे,आण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री युसुफ सर,व्यवस्थापक श्री लक्ष्मण व सुमसिन सर,लोकनेते राजारामबापू नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ अविनाश साळुंखे,अकॅडमिक हायइट्स स्कूल कराडचे प्राचार्य श्री कलाधरण,एच .के .स्कूल ट्रेंझ सीईओ श्री हरीकृष्णन,व्यवस्थापक श्री गोविंद वारीअर,प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ मधुकुमार नायर,उपप्राचार्या सौ सिंधू नायर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्ग उपस्थित होता.












































































