Last Updated on 23 Aug 2023 7:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान ३ चे थेट प्रक्षेपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व निशिकांत दादा युथ फौंडेशन च्या वतीने एलईडी स्र्कीनवर इस्लामपूर शहरवासियांना दाखवण्यात आले.यावेळी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती.
इस्रोच्या या महत्वकांक्षी मोहिमेमुळे चंद्र मोहीम यशस्वी करणाऱ्या जगातील प्रमुख देशाच्या यादीत चार नंबरला भारताचे नाव नोंदवले जाणार असून हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार इस्लामपुर शहरवासीयांना होता यावे तसेच इस्लामपूर मधील उद्योजक, नोकरवर्ग, विदयार्थी यांना हे चंद्र्यान लँडिंग पाहता यावे या साठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष, इस्लामपूर नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा व युथ फौंडेशन च्या वतीने सदर प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले.
चंद्र्यान चंद्रा वरती यशस्वी लँडिंग होताच इस्लामपूर करांनी भारत माता कि जय,जय श्री राम घोषणाने परिसर दुमदुमून सोडला.फाटक्याची अतिशबाजी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीने लाईव्ह प्रेक्षपणाचे आयोजन केल्या बद्दल इस्लामपूरकरानी आभार मानले. चंद्र्यान च्या यशस्वी लँडिंग नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या ऐतिहासिक क्षणाच्या लाईव्ह शुभेच्छा दिल्या. शेवटी राष्ट्रगीताचे गायन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हेही वाचा – जय हो ! चांद्रयान 3 यशस्वी…चंद्रावर उतरले…भारताने रचला इतिहास
हे प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्लामपूर शहरातील बहुसंख्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष अशोक खोत,माजी नगरसेवक सुभाष शिंगण,भाजपाचे जिल्हा चिटणीस संजय हवालदार,भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस प्रवीण परीट,युवा नेते अक्षय पाटील,अक्षय कोळेकर,दिनकर खांडेकर,अल्ताफ तहसीलदार,गौरव खेतमर,आबा मोरे,मधुकर हुबाले,सोमनाथ जाधव,निवास पाटील,अक्षय कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर,कार्यकर्ते,शहरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































