Last Updated on 23 Feb 2022 10:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफ्आरपीचे तुकडे पाडणाऱ्या शासन आदेशाची इस्लामपुर तहसीलदार कार्यालयासमोर होळी करण्यात आली.
मंत्रालय सचिव व राज्यशासने काढलेल्या दोन टप्प्यातील अध्यादेशाचे होळी करण्यात आली व राज्यशासनाचा तीव्र निषेध करुन राज्यशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आले,यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले की,सरकार व कारखान्यादार यांना सोबत घेऊन ह्या शेतकऱ्यांच्या एकरकमी हक्कावर दरोडा टाकण्याचे काम करत आहे.एकरकमी कायदा केंद्र सरकारने मंजूरकेला असुन राज्य शासनाला या कायद्यात मोडतोड करण्याचा कोणताही अधिकार नाही.याची किंमत राज्य सरकारला मोजावी लागेल.
यावेळी स्वाभिमानी नेते भागवत राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील प्रभाकर पाटील प्रवासी वाहतूक संघटनेचे तानाजी साठे शहराध्यक्ष अनिल करळे,प्रताप पाटील, राजाराम परिट,रमेश पाटील, जयवंत पाटील,अशोक बल्लाळ,एकनाथ निकम,लक्ष्मण डुके,रविंद्र रोकडे, सह कार्यकर्ते उपस्थित होते.












































































