Last Updated on 03 Mar 2025 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. लडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार हे सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे.
अदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता 8 मार्च महिला दिनच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या खात्यात जमा होईल. साधारण 5 – 6 मार्च पासून संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे 8 मार्च रोजी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































