Last Updated on 18 Apr 2025 3:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या १४१ मुला-मुलींना एकूण १० लाख ८८ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आरआयटी) मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी आर्थिक मदतीचा धनादेश आरआयटीचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रा. शामराव पाटील, प्राचार्य आर. डी. सावंत, सचिव डी. एम. पाटील, मुख्य लेखापाल संतोष खटावकर, रजिस्ट्रार सौ. सारिका पाटील आणि प्रा. डी. एस. पाटील उपस्थित होते.
माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण भागातील सभासद शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणात मदतीचा हात देण्याची ही परंपरा आजही सुरू आहे. ही मदत राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून दिली जाते.
हेही वाचा – वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत २३ एप्रिलला
बीटेक-एमटेकच्या ८४ विद्यार्थी- विद्यार्थिनीं ना ८ लाख ४० हजार,डिप्लोमाच्या ३३ विद्यार्थी-विद्यार्थिनींना १ लाख १८ हजार ८००,एमबीए-एमसीएच्या १२ विद्यार्थी- विद्यार्थिनींना ९३ हजार ६००,तर बीबीए-बी सीएच्या १२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना ३६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.











































































