Last Updated on 11 Jun 2024 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पाऊस दक्षिण भारतात दाखल झाला असून हळूहळू उत्तर भारताकडे सरकत आहे.पावसाळा बऱ्याच जणांना आवडतो,मात्र हा पाऊस वाहनचालकांसाठी त्रासदायक असतो.पावसात कार चालवणं सोपं काम नाही.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होतात.हे अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यात गाडीची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.
मान्सूनपूर्व गाडी सर्व तयारीनिशी सज्ज ठेवली तर ऐन पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या समस्यांपासून काही प्रमाणात बचाव करता येतोच. त्यासाठी या तयारीबरोबर तिची चाचणीही घेण्याची खबरदारी घ्यावी. विशेषत: बॅटरीशी संबंधित इतर उपकरणे, सुविधा सुरळीत आहेत की नाही, हे आवर्जून पाहावे. हॉर्न, लाइट, इंडिकेटर, ऑटोमॅटिक डोअर लॉक अथवा ग्लास सिस्टम हे तपासून घ्यावे. थोडय़ा पाण्यातही या बाबींमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करून घ्यायला हवी.
अशी घ्या कारची विशेष काळजी…
कार स्वच्छ करा
पावसाळ्यात कारची काळजी घेताना सर्वात पहिली गोष्ट कुठली करायची असेल तर ती म्हणजे कारची एकदा सर्व्हिसिंग करून घ्यायला हवी. ऋतुबदलांनंतर वाहनांमध्ये अनेक समस्या येतात, ज्या कार वेळेवर सर्व्हिस केल्याने दुरुस्त होतात. तुम्ही अजून कारची सर्व्हिसिंग करून घेतली नसेल तर आत्ताच करून घ्या.
लाईट्स चेक करा
कधी कधी पाऊस धो-धो पडत असतो, आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरलेलं असतं, त्यामुळे दिवसा देखील अंधार पडतो. त्यावेळी आपल्या कारच्या हेडलाईट्सच कामी येतात.त्यामुळे सर्वात आधी कारच्या हेडलाईट्स, टेललाईट्स आणि टर्न इंडिकेटर्स तपासून घ्या.जर त्या लाईट्स खराब असतील तर दुरूस्त करून घ्या.
वायपर ब्लेड तपासून घ्या
भर पावसात कार चालवताना वायपरचा खूप उपयोग होतो. पावसाळ्यात कारची विंडस्क्रीन साफ करून कार चालवत असताना वायपर ब्लेड आपली मदत करतात. परंतु पावसाळा सुरू होण्यापूर्वी गेले अनेक महिने तुम्ही वायपर ब्लेड वापरले नसतील. त्यामुळे ते सुरु आहेत की नाही, कारची काच साफ करतायत की नाही हे तपासून घ्या. यासोबतच वॉशर सिस्टिमचीही तपासणी करून घ्या.
ब्रेक्स सर्वात महत्त्वाचे
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. बाइक स्लिप होणं, कार स्लिप होण्यासारख्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. त्यामुळे तुमच्या गाडीचे ब्रेक नीट असणं गरजेचं आहे. पावसाळ्यात अनेकदा ब्रेक स्किड होतात. त्यामुळे वाहन हळू चालवणं हा सर्वात मोठा उपाय असतो.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
कृषी विभागाच्या कल्याणकारी योजना… जाणून घ्या
टायर्सची काळजी घ्या
पावसाळ्यात वाहन चालवताना त्या वाहनाचे टायर्स उत्तम स्थितीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ओल्या रस्त्यांवर वाहनं स्लिप होतात. ब्रेक दाबल्यानंतरही कार स्लिप होते. त्यामुळे कारचे टायर खराब असल्यास अपघाताचा धोका वाढतो.
गाडी झाकून ठेऊ नका
पावसाळ्यात गाडी कव्हरने झाकून ठेवण्याची अनेकांना सवय असते. मात्र पावसाळ्यात आपली गाडी झाकून ठेवू नका. गाडी झाकून ठेवल्याने गाडीला गंज लागू शकतो. त्यामुळे पाऊस पडत असताना गाडी झाकून ठेऊ नका.
मुसळधार पाऊस पडत असताना वाहन चालविणे टाळा.पण जर अत्यावश्यक असेल तर केवळ पहिल्या गियरवर गाडी चालवा आणि पूर्ण एक्सिलरेटरचा वापर टाळा. पाणी भरलेल्या क्षेत्रातून वाहन चालविताना खिडक्याच्या काचा बंद ठेवा. कार मध्येच बंद पडली तर कार लगेच सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.
कार बिघडली तर.. जर तुमची कार बिघडली, तर कार पार्क करा आणि जवळपासच्या गॅरेजचा शोध घ्या. तसेच गॅरेजच्या नावांची यादी सोबत ठेवा.
तुमच्या सेल फोनमध्ये आयसीई (तात्काळ स्थितीमध्ये) नंबर सेव्ह करा, ज्यामुळे काही घटनांमध्ये जवळच्या गॅरेजला फोन करता येईल. तसेच हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन्स, अग्निशमन दल यांचे नंबरदेखील सेव्ह करा.
गाडीत काही अॅक्सेसरीज बसवल्या तर पावसात गाडी चालवणे सोपे जाते.
अॅक्सेसरीजची माहिती अशी
जलरोधक (वाटर रिपेलेंट)
जेव्हा पाऊस पडतो तेव्हा विंडस्क्रीनवर पाणी आल्याने दृश्यमानता कमी होते.पण गाडीच्या विंडशील्डवर वॉटर रिपेलेंट लावले तर पावसाचे पाणी विंडशील्डवर राहत नाही. ते लावल्यानंतर वॉटर रिपेलेंट हायड्रोफोबिक ढाल बनवते आणि पाणी स्थिर होत नाही. यामुळे पावसातही दृश्यमानता सुधारते.
पावसाचे व्हिझर
पावसाळ्यात कधी कधी हलक्या खिडक्या उघड्या असतात. काही लोक हे वायुवीजनासाठी करतात.पावसाळ्यात काच थोडी उघडी राहिल्यास पावसाचे पाणी गाडीच्या आत शिरते. हे टाळण्यासाठी गाडीवर रेन व्हिझर्स बसवता येतात.
वायू – सुगंधक (एयर फ्रैशनर)
पावसाळ्यात गाडीच्या केबिनमध्ये ओलावा जास्त असतो.त्यामुळे कधी कधी गाडीत विचित्र वास येऊ लागतो.ज्यामुळे गाडीत बसणे कठीण होते.त्यामुळे एखादा छान कार प्युरिफायर गाडीमध्ये ठेवा.











































































