Last Updated on 24 Jan 2024 12:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.भूमी अभिलेख विभागाकडून मंगळवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली आहे.परीक्षेची गुणवत्ता यादी याआधीच जाहीर करण्यात आली होती. आता अंतिम निवड यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते 13 जिल्हे वगळून अन्य 23 जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्या उमेदवारांना पाहता येणार आहे.सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.
तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यात 57 सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप,हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मुदत देण्यात आली होती.
संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांवर 16 हजार 205 आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले.त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती धाराशिव, हिंगोली. संभाजीनगर या 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
तलाठी सरळसेवा भरती – 2023 जिल्हा निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी
येथे क्लिक करा
👇👇👇👇
| अकोला | कोल्हापूर | नागपूर | परभणी | बुलडाणा | भंडारा |
| मुंबई | मुंबई उपनगर | रत्नागिरी | लातूर | वर्धा | छत्रपती संभाजीनगर |
| वाशिम | सातारा | सांगली | सिंधुदुर्ग | सोलापूर | हिंगोली |
| जालना | बीड | धाराशिव | गोंदिया | रायगड |












































































