Last Updated on 25 Apr 2023 9:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
युवा नेते प्रतिकदादा पाटील यांना आमच्याबरोबर लोकसभेस द्यावे’ खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे आवाहन
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतपाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज असून ते राज्याचे आदर्श मुख्यमंत्री ठरतील,अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील मौजे डिग्रज (ता.मिरज) येथील समारंभात बोलताना व्यक्त केला. सध्या आ.जयंतराव पाटील यांची राज्याला गरज असल्याने युवा नेते प्रतिकदादा पाटील यांना आमच्याबरोबर लोकसभेस द्यावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष प्रतिकदादा जयंतराव पाटील यांचा खा.कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी आ.जयंतराव पाटील, प्रा.शामराव पाटील,उद्योजक भालचंद्र पाटील,उपसरपंच तानाजी जाधव,पै.धनपाल खोत (सांगली), राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील,संजय पाटील,सौ.सुनिता देशमाने,भरत देशमुख, संग्राम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील यांनी राज्यात सर्वात जास्त वेळ राज्याचे अर्थमंत्री पद भूषविले आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम करतील,असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,सध्या राजकारण कुस बदलत असून सहकाराची झपाट्याने खाजगी करणाकडे वाटचाल सुरू आहे. आपण मात्र सहकारी तत्वाशी नाळ घट्ट ठेवत चार युनिट सहकारी तत्वावर चालवीत आहात. आ. जयंतराव पाटील यांनी राज्यात प्रभावी काम करताना आपल्या कुटुंबाला वेळ दिला असून प्रतिकदादा व राजवर्धनवर चांगले संस्कार केलेले आहेत.प्रतिक पाटील हे आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कल्याण साधतील. ते अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत घेऊन जातील.
आ.पाटील म्हणाले,मी राजकारणात आलो,तेंव्हा फारसे बोलायला येत नव्हते. मात्र प्रतिक चांगला बोलतोय. पी.आर.दादांनी १९९५ पासून कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चोख पार पाडत संस्थेची वाढ केलेली आहे. सध्या सभासदाच्या शेअर्सची किंमत लाखाच्यावर झाली आहे. दादांच्या नंतर कोण? असा प्रश्न होता. मात्र जेष्ठांशी चर्चा आणि युवकांच्या मागणीतून आपण प्रतिक व १४ नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. ते निश्चितपणे आपल्या संस्थेस अधिक गतीने पुढे नेतील.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. स्व. बापूंनी प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखाना उभा करून शेतकऱ्यांची प्रगती साधली,युवकांना नोकऱ्या दिल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी नेण्यासाठी पाणी परवाने घेतले. मात्र त्यांचे अकाली निधन झाले. मा.साहेबांनी गावोगावी पदयात्रा काढून सर्वांना विश्वासात घेत स्व.बापूंचे स्वप्न
पूर्ण केले. मा.साहेबांनी आपल्या ८ गावात ५० कोटींचा निधी दिला असून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी शासनाच्या वतीने ८०:२० सारखी योजना राबवित आहे. मी जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान,व्हॉलीबॉल असोसिएशन,आयबीएफ व ड्रोन आदी उपक्रमांच्या माध्यमातून काम करीत आहे.
यावेळी प्रा.शामराव पाटील,भरत देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केली.प्रारंभी उपसरपंच तानाजी जाधव यांनी स्वागत,तर उद्योगपती भालचंद्र पाटील यांनी प्रास्तविक केले. रावसो शिवगोंडा पाटील यांनी आभार मानले. विजय कडणे सांगली यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य सुरेश पाटील,सचिन पाटील (कवठेपिरान),शिवाजी चोर मुले (आष्टा),राजू पाटील (कर्नाळ),संजय चव्हाण (कसबे डिग्रज),राहुल माणगांवे, विलास आवटी (दुधगाव), माणिक पाटील (तुंग),तसेच मौजे डिग्रजच्या माजी सरपंच सौ.गितांजली इरकर,सुखदेव साळोखे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासो पाटील,रमेश श्रीरंबेकर,संदीप पाटील,सुजित साळोखे, वसंत हौजे,गजानन लांडे,राजाभाऊ बिरनाळे,महावीर हौजे,श्रीपाल बिरनाळे, श्रीपाल चौगुले,अनिल हवाने यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.













































































