Last Updated on 22 Oct 2021 3:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महत्त्वाचे का असते हे जाणून घ्या
जिवंतपणी व्यक्ती विषय वासनेत अडकलेली असते. ज्ञानाच्या परमार्थाच्या गोष्टी आत्मसात करत नाही आणि अचानक मृत्यू आला की सर्व काही जागच्या जागी सोडून परलोकी निघून जाते. अशा वेळी आत्म्याच्या उद्धारासाठी व त्याला योग्य दिशेने गती मिळावी यासाठी गरुड पुराणाने पिंडदान महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे.
असे मानले जाते की मृत्यूच्या तेराव्या दिवशी, पिंडातून आत्मा ब्रह्माण्डात जातो. हा सूक्ष्म आत्मा परमात्म्यात विलीन होण्यासाठी त्याला योग्य दिशा दर्शवणे गरजेचे असते. या तेरा दिवसात व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याचा हिशोब केला जाऊन त्याला त्याच्या कर्मानुसार गती मिळते. श्राद्ध विधी त्याकरिताच सांगितलेल्या आहेत.
या विधीनुसार आत्म्याला सर्व विकारातून, विषयातून मुक्त करून अखिल विश्वशक्तीत सामावण्याचा मार्ग दर्शवला जातो. मृत्यूपश्चात तेरा दिवस आत्मा घुटमळत असतो गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचा आत्मा १३ दिवस त्याच्या आवडत्या व्यक्तीजवळ, विषयांजवळ घुटमळत राहतो. या काळात त्याला राहिलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा देहात प्रवेश करायचा असतो.
परंतु एका जन्मात अनंत यातना भोगल्यानंतर पुन्हा जन्मच नको, तर मोक्ष मिळावा, यासाठी आत्म्याला विषय वासनेपासून मुक्त केले जाते. जिवंत पणी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आत्म्याला मोहपाशापासून दूर करण्यासाठी श्राद्धविधी केला जातो.
(टीपःया लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्रीची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी ‘अधोरेखित’ देत नाही.ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/विश्वास /धर्मग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे,त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वतः त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल)











































































