Last Updated on 26 Jul 2024 1:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 78 हजार 487 क्युसेस अशी सुरू आहे.दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच असून कोयनेच्या जल साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (26 जुलै) सकाळी आठ पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 81.19 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 77.14 टक्के भरले आहे.
कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे.कोयना धरणामध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सद्यस्थितीत गुरुवारी दुपारी चारपासून सांडव्यावरून 10 हजार विसर्ग चालू होता.तथापि, पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 20 हजार क्युसेक्स करण्यात आला.त्याचबरोबर आज सकाळी 7 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 30 हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला, तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.त्यामुळे उद्या धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 31 हजार 050 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे,त्यामुळे कृष्णेचे पाणी पात्राबाहेर आले आहे.काही ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे.लोकांचे स्थलांतर सुरु झाले आहे.भारतीय हवामान खात्याने 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.त्याचबरोबर उरमोडी धरण पाणलोट क्षेत्र,धोम धरण पाणलोट क्षेत्र,कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु आहे.या धरणातूनही विसर्ग सुरु आहे.पावसाची स्थिती आणखी दोन-तीन दिवस अशीच सुरु राहिल्यास कृष्णाकाठाला महापुराचा धोका संभवू शकतो.
हेही वाचा – सांगली : पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, सेल्फी काढण्यास मनाई; या 27 ठिकाणी जाण्यास बंदी
दरम्यान, आज दि. 26 जुलै रोजी दुपारी 12 वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून 40 हजार क्युसेक्स विसर्ग नियोजित होता.तथापि, पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे सदर वाढ तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेसद्यस्थितीत सांडव्यावरून 30 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह एकूण विसर्ग 32 हजार 100 क्युसेक्स आहे.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.शुक्रवारी (25 जुलै) सकाळी आठ पर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 198 मिलिमीटर, नवजा येथे 172 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 267 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 81.19 टीएमसी इतका झाला असून धरण 77.14 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 255 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 794 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 375 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
वीजप्रवाह : पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय रस्त्यांवर गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हा…
पूर नियंत्रण कक्ष, सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–26/07/2024 8:00 AM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/27’06”
2) बहे पूल-(23.7)12’09”
3) ताकारी पूल (46)/42’0″
4)भिलवडी पूल -(53)39’10”
5)आयर्विन- (45)/36’06”
6)राजापूर बंधारा-(58)/47’10”
7) राजाराम बंधारा-(43)/44’09”
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 69993
2) आयर्विन पूल – 81797
3) राजापूर बंधारा – 177500
4) राजाराम बंधारा – 64135
5) कोयनाधरण- 81.20 TMC/32100
6)वारणा धरण- 30.53 TMC/ 15785
7)अलमट्टी धरण- 83.486
आवक – 204098
जावक-275000
Update news : 26/07/2024 08:00 AM








































































