Last Updated on 08 Dec 2024 5:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सोलापूर । महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० आगाही जिंकता आल्या नाहीत, ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावा निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाने गावात मोठा पोलिस फौजफाटा लावून ही प्रक्रिया रद्द करण्यास गावकऱ्यांना भाग पाडले. यानंतर आज शस्द पवार यांनी मारकडवाडी गावाला भेट दिली. यावेळी ते ईव्हीएम हटाव, देश बचाव या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पाश्चिमात्य देशांमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या जात असतील तर भारतातही बैलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मारकडवाडीतील नागरिकांना बॅलेट पेपरवर मतदान करायचे आहे. अशी भूमिका घेतल्यावर त्यांच्यालवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे आश्चर्यकारक आहे. तुम्ही माझ्याकडे ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या आम्ही निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. यावेळी ईव्हीएमवर निवडणूक नको, ती मतपत्रिकेवर व्हावी, असा ठराव देखील एकमताने करण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, निवडणुका होत असतात. यात काही लोकांचा विजय होतो. तर, काहींना पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 30 Oct 2026 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit बाह्यरुग्ण तपासणीसह घरभेटी, टेलिमेडिसिन आणि १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्यांवर भर मुंबई | राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार,... Read more
बॅलेट पेपरवर निवडणुका का नाही? : शरद पवार
जगात अमेरिका, इंग्लंड अशा अनेक देशात बैलेट पेपरवर निवडणुका होतात. जर संपूर्ण जगभरात निवडणुका बैलेट पेपरवर होत आहेत. तर आपल्या अशा पद्धतीने निवडणुका का होत नाहीत? असा शरद पवार यांनी उपस्थित केला.
तर का घाबरता: जितेंद्र आव्हाड
मारकवाडी येथे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा कार्यक्रम मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तर, तुम्ही त्यांना बैलेट पेपरवर मतदान करण्यास का रोखत आहात. त्यांना जर बॅलेट पेपरवर मतदान करायचे असल्यास त्यांना करू द्या. त्यात हस्तक्षेप करून त्यांच्यार गुन्हे नोंद करण्याची काय गरज आहे. तुम्ही यांना घाबरलात का? असा सवाम जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला.













































































