Last Updated on 14 Oct 2021 4:28 AM by Sanjay Patil/Adhorekhit
-
अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा
-
ठाकरे सरकारने जाहीर केली १० हजार कोटी रुपयांची मदत
-
मदतीसाठी विलंब करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये होती नाराजी
मुंबई :
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआर एफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे. झालेले नुकसान भरून न येण्यासारखे असले तरी राज्यसरकार कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टी व पूरग्रसत्तांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास श्री. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
अशी दिली जाईल मदत
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वपूर्ण निर्णय
-
पदोन्नतीमधील आरक्षण काम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार
-
केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबवणार
-
सहकारी संस्थांचे सदस्य नियमत समजण्यासाठी अधिनियमात सुधारणा
-
बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय
-
कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय











































































