Last Updated on 16 Aug 2024 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हरियाणा आणि जम्मू व काश्मीर विधानसभांसाठी सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केली. जम्मू व काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर हरियाणा विधानसभेसाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, हरियाणात 10 हजार 321 मतदार आहेत ज्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. हरियाणात एकूण 2.1 कोटी मतदार आहेत आणि मतदान केंद्रे 20629 केंद्रे आहेत. हरियाणातील गुडगाव, फरीदाबाद आणि सोनीपत येथील बहुमजली इमारतींमध्येही मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 360 मॉडेल केंद्रे आणि हरियाणामध्ये 150 मॉडेल केंद्रे असतील. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 11 हजार 338 मतदान केंद्रे असतील. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 20 ऑगस्टला आणि हरियाणात 27 ऑगस्टला मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन होणार आहे.
जम्मू व काश्मीर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वेळापत्रक
| निवडणूक कार्यक्रम | टप्पा I
(24 वि.मतदारसंघ ) |
टप्पा –II
(26वि.मतदारसंघ ) |
टप्पा –III
(40वि.मतदारसंघ) |
| निवडणूक अधिसूचना जारी होण्याची तारीख | 20.08.2024 (मंगळवार ) | 29.08.2024 (गुरुवार) | 05.09.2024 (गुरुवार) |
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत | 27.08.2024 (मंगळवार ) | 05.09.2024 (गुरुवार ) | 12.09.2024 (गुरुवार) |
| उमेदवारी अर्ज छाननी दिनांक
|
28.08.2024 (बुधवार) | 06.09.2024 (शुक्रवार ) | 13.09.2024 (शुक्रवार ) |
| उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | 30.08.2024 (शुक्रवार) | 09.09.2024 (सोमवार) | 17.09.2024 (मंगळवार) |
| मतदानाची तारीख
|
18.09.2024 (बुधवार ) | 25.09.2024 (बुधवार ) | 01.10.2024 (मंगळवार ) |
| मतमोजणीची तारीख | 04.10.2024 (शुक्रवार ) | ||
| या तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे | 06.10.2024 (रविवार) | ||
हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वेळापत्रक
| निवडणूक कार्यक्रम | हरियाणा
(विधानसभेच्या सर्व 90 जागा ) |
| अधिसूचना जारी होण्याची तारीख | 05.09.2024 (गुरुवार ) |
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
|
12.09.2024 (गुरुवार ) |
| उमेदवारी अर्ज छाननी दिनांक
|
13.09.2024 (शुक्रवार) |
| उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | 16.09.2024 (सोमवार ) |
| मतदानाची तारीख
|
01.10.2024 (मंगळवार ) |
| मतमोजणी | 04.10.2024 (शुक्रवार ) |
| या तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे | 06.10.2024 (रविवार ) |
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024
5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. 2018 मध्ये विधानसभा विसर्जित करण्यात आली. जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण 90 जागा आहेत. जम्मू प्रदेशात विधानसभेच्या 47 आणि काश्मीर प्रदेशात 43 जागा आहेत. जम्मू-काश्मीर निवडणुकीत शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. राज्यत्व, सुरक्षा, रोजगार हे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे प्रमुख मुद्दे आहेत.











































































