Last Updated on 02 Oct 2023 7:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू सहकारी साखर कारखाना व हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर चारशे रुपये दुसरा हप्ता दिला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने ढोल बजाव आंदोलन केले.
राजारामबापू कारखाना मेन गेटवर ढोल बजाव आंदोलनद्वारे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील कार्यकारी संचालक आर.डी. माहुली यांनी निवेदन स्वीकारले.
हुतात्मा साखर कारखान्यावर कारखाना मेन गेटवर आंदोलन करण्यात आले.कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव म्हणाले,पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगांव साखर कारखान्यांनी साडेअकरा रिकव्हरी असताना 3440 रुपये प्रति टनास दर दिला आहे. मगं राजारामबापु कारखाना कां देवू शकत नाही.राजारामबापू साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दुसरा हप्ता चारशे रुपये दिला पाहिजे.अन्यथा कारखान्याआतुन बाहेर पडणारी साखर बंद करु 400 रुपये हप्ता दसरा सण पुर्वी द्यावा अन्यथा साखर कारखान्याची धुराडे पेटु देणार नाही.ऊसाला चारशे रुपये हप्ता मिळालाच पाहिजे.
‘एकच गट्टी राजु शेट्टी’ अशा जोरदार घोषणाबाजी कारखाना परिसरात दमदमुन गेला.यावेळी ढोल बजाव आंदोलनात भागवत जाधव,आप्पासाहेब पाटील,अॅड.एस्.यु. संदे,बाबासाहेब सांद्रे,जगन्नाथ भोसले,प्रकाश देसाई,तानाजी साठे,प्रदीप पाटील,संतोष शेळके,प्रभाकर पाटील,काशिनाथ निंबाळकर,राजाराम परीट,अभिनंदन नवले,अनिल करळे,पंडीत सपकाळ,एकनाथ निकम,भगवान सुतार,प्रकाश माळी,शहाजी पाटील,प्रताप पाटील,अरुण कवठेकर,अभय मजगुडे ,काशिन जमादार,सजिंव हरवाडे,सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









































































