Last Updated on 21 Feb 2023 12:57 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी कला रसिकांना तीन- साडेतीन तास ठेवले खिळवून
सांगली । चुम्मा-चुम्मा दे दे,मेरा मुखडा,मै हु डॉन,के पग घुंगरी,मेरा नाम है लखन,ओम शांती ओम या हिंदी गाण्यापासून नवीन पोपट हा,कोंबडी पळाली,मी ढोलकं रं आदी मराठी गाणी सादर करीत प्रख्यात हिंदी पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी इस्लामपूरच्या कला रसिकांना तीन- साडेतीन तास खिळवून ठेवले.सुदेश भोसलेंच्या साथीने इस्लामपूरवासीय थिरकले.आविष्कार कल्चरल ग्रुपच्या २१ व्या संगीत महोत्सवात पहिली रात्र सुदेश भोसले यांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांनी यादगार ठरली.आपल्या सुरेल आवाजात दर्दभरी गाण्यांच्या सादरीकरणाने भोसले यांनी उपस्थितांची हृदये जिंकली.
माजी मंत्री आ. जयंतराव पाटील,खा.श्रीनिवास पाटील, सौ.शैलजादेवी पाटील,अँड.बी.एस.पाटील यांच्यासह ५-६ हजार कलारसिकांनी या संगीत रजनीचा आनंद घेतला. आविष्कार कल्चरल ग्रुपच्या २१ व्या संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी ‘सुदेश भोसले-लाइव्ह ईन कॉन्सर्ट’चे आयोजन केले होते.
त्यांनी एकामागून एक अशी लाल दुपटे वाली,दिलबी गया रे,मेरा दिल ले लिया, थोडासा प्यार चाहिए,मेरे मेहबूब,ए जो मोहब्बत है,इंतहा हो गई इंतजार कि,चिंगारी, ओ साथी रे,ए श्याम मस्तानीतसेच पोरी जरा जपून दांडा धर,वर ढगाला लागली कळ,गोमू संगतीने,हिल पोरी हिल,गोविंदा रे गोपाळा असंख्य गाणी त्यांनी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘एक चतुर नार’या गाण्यावर सुदेश भोसले व त्यांचा मुलगा सिद्धांत यांच्या तील जुगलबंदी अप्रतिम होती. सिद्धांत,पराग चौधरी,विजय केळकर यांनीही काही गाणी सादर केली. जागतिक किर्तीच्या ‘मेलडी मेकर्स’चे प्रवीण सराफ यांनी संगीत संयोजन केले.देशातील सर्वात उत्तम व जुन्या ऑर्केस्ट्राच्या सप्तसुरांचा आस्वादही रसिकांनी घेतला.

यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,उपाध्यक्ष विजय पाटील,कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,गिरीश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,उद्योजक अनंत चितळे,सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. आविष्कारचे उपाध्यक्ष भूषण शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अँड.धैर्यशील पाटील,तहसिलदार प्रदीप उबाळे,उद्योजक सर्जेराव यादव,बाळासाहेब पाटील,स्मिता चितळे,सौ.सुस्मिता जाधव,संजय पाटील, रोझा किणीकर, खंडेराव जाधव,उद्योजक अनिल जाहीर, सुजितकाका पाटील,अमोल पाटील यांच्यासह ५-६ हजार कला रसिकांनी या संगीत रजनीचा आनंद घेतला.
मोहन चव्हाण,नजीर शेख,अध्यक्ष सुनील चव्हाण,प्रा.कृष्णा मंडले,राजवर्धन लाड,प्रताप सरनोबत,धनंजय भोसले,विजय लाड,अजय थोरात,बी.आर.पाटील,विश्वास कदम,संजय पाटील,ज्ञानदेव देसाई,विनायक यादव,महेश पाटील,आप्पासो जावीर,विजय नायकल, संतोष पाटील,हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील, विशाल पाटील,अक्षय जाधव,अक्षय पाटील, विश्वजित पाटील,सूरज कचरे,किरण पाटील, प्रशांत पाटील,अभिजित पाटील,सचिन शिंगटे यांच्यासह आविष्कारच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन केले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.
स्व. घोरपडेभाऊ,सुधीर पाटील यांना श्रद्धांजली
आ.जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात ‘आविष्कार’चे दिवंगत सचिव राजेंद्र घोरपडे,माजी अध्यक्ष सुधीर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दोघांनी आविष्कारच्या वाटचालीत मोठे योगदान केले असल्याचे त्यांनी सांगितले.











































































