Last Updated on 31 Mar 2023 10:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
आधार प्रमाणिकरण 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन
सांगली । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची 5 वी यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
शासनाने प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये आत्तापर्यंत 87 हजार 897 इतक्या लाभार्थ्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत. यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण 15 एप्रिल 2023 पर्यंत करून घ्यावे.
आधार प्रमाणिकरण न केल्यास कर्जमाफीच्या लाभाची रक्कम खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे तात्काळ आधार प्रमाणिकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.












































































