Last Updated on 29 Jul 2022 9:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने स्विय निधी योजना अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांसाठीच्या योजना ट्रॅक्टर,पावर टिलर,कडबाकुट्टी मशिन आदी औजारे अनुदानासाठी अर्ज सुरु झाले आहेत.
सदर अर्जामध्ये मागणी केलेल्या आयुधे/औजारे नाव, आयुधे/औजारे कोटेशन क्र. व दिनांक,बँकेचे पूर्ण नाव व शाखा, बँकेचा खाते नंबर (आधारकार्डशी जोडलेला असावा),बँकेचा आय एफ एस सी (IFSC) नंबर, आधार कार्ड क्रमांक, इत्यादी तपशील योग्यरीत्या लिहून दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र,आणि जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमाती ) असल्यास जोडावे.
योजनेबाबत सविस्तर माहिती अशी :
१) कडबाकुट्टी मशिन : २ एच.पी. इलेक्ट्रीक मोटरसह (ISI mark) योजना
अनुदान मर्यादा : ९ हजार रुपये किंवा किमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते.
२) पावर टिलर : ८ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेचा रोटरीसह योजना
अनुदान मर्यादा : ५० हजार रुपये किंवा किमतीच्या ४० टक्के यापैकी जे कमी असेल ते
३) ट्रॅक्टर : ०८ ते ७० PTOHP योजना
अनुदान मर्यादा : ९० हजार रुपये प्रति लाभार्थी
अर्जासोबत ही जोडा कागदपत्रे
- सातबारा खाते उतारा
- आयुधे/औजारे कोटेशन
- आधार कार्ड स्वयंसाक्षांकित प्रत
- बँक पासबुक झेरॉक्स प्रत ( IFSC कोड सहित )
- हयातीचे स्वयंघोषणापत्र
- लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र
- दिव्याग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत (असल्यास)
- मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैध जात प्रमाणपत्राची प्रत
- यापूर्वी सांगली जि.प. कडील & या वैयक्तिक योजनेचा लाभ न घेतलेचे हमीपत्र.
लाभार्थी निवड निकष
- यापूर्वी जि.प.च्या कडबाकुट्टी मशिन/पावर टिलर/ट्रॅक्टर या वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- स्वतः चे नावे ७/१२ व खाते उतारा असावा,
- महिला लाभार्थी व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.
- दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल.
- कडबाकुट्टी मशिन करीता अर्जदार शेतकऱ्याकडे पशुधन असलेबाबतचा पशुवैद्यकीय यंत्रणेचा दाखला
कृषी विभाग जिल्हा परिषद सांगली यांचेकडील स्वीय निधी योजनेतून आयुधे / औजारे लाभ मिळणेबाबत अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी
- अर्ज नमुना : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : www.zpsangli.com
◆ अधिक माहितीसाठी संपर्क:
- जिल्हा परिषद सांगली अंर्गत पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

गट विकास अधिकारी,पंचायत समिती यांचेकडे ३१ ऑगस्ट २०२२ अखेर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार आहे.









































































