Last Updated on 16 Oct 2025 8:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । दिपावली सणाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलासिमा हद्दीत दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर दि. 17 ऑक्टोबर 2025 ते 23 ऑक्टोबर 2025 अखेर पर्यंत पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता, सुव्यवस्था राखण्याकरीता (१) पेट्रोल/डीझेल पंप/ डेपो (ii) गॅस सिलेंडर गोडाऊन (iii) केरोसीन तेलाचे डेपो (iv) फटाक्यांची दुकाने (v) ज्वालाग्रही पदार्थांचे डेपो, (vi) रासायनिक पदार्थांचे डेपो या नमूद ठिकाणापासून 100 मीटर आत फटाके उडविण्यास मनाई केली आहे. शाळा, कॉलेज, रूग्णालये, न्यायालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोन मध्ये येतात, त्या भागात १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. फटाक्याच्या लडी व असे फटाके जे मोठे प्रमाणात प्रदुषीत हवा, आवाज, घनकचरा तयार करतात अशा प्रकारच्याा तत्सम फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे बलून्स, आकाश दिवे/ आकाशाकंदील, ड्रोन आदी आकाशांमध्ये सोडण्यास/ उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jun 2026 9:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit राजारामबापू समूहाचा ‘पी.एम. सूर्यघर’ योजनेसाठी मोठा निर्णय सांगली । विजेच्या वाढत्या बिलाने सामान्य माणूस त्रस्त झाला असून विजेचा तुटवडा दिवसेंदिवस वाढ... Read more
- ‘कृष्णा’वर पुन्हा जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची सत्ता; ‘पोल पंडित’ एक्झिट पोलचा अंदाज
- ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा; शासन लवकरच घेणार दिलासादायक निर्णय
- लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवर आता कडक निर्बंध
- अल निनो संकट काय आहे? जाणून घ्या शेतीवर होणारा परिणाम आणि उपाय
- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय; रोजगार हमी अधिनियमात सुधारणा
- जनगणना २०२७ चा महाराष्ट्रातील पहिला टप्पा यशस्वी










































































