Last Updated on 03 May 2023 6:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निलेश कुडाळकर तर जिल्हा प्रधान सचिव म्हणून प्रा. डॉ राम घुले,प्रा डॉ.काशीलिंग गावडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे,राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सांगली जिल्हा कार्यकारिणी अशी,
अध्यक्ष – प्रा विजयकुमार जोखे(शिराळा),उपाध्यक्ष -ॲड.के डी शिंदे (सांगली),बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह – राजू कोळीगुद्दे (तासगाव),सहकार्यवाह – जगन्नाथ माने (इस्लामपूर),विविध उपक्रम विभाग -खंडू मधुकर घोडे(संख),महिला सहभाग -शुभांगी शंकर चव्हाण (सांगली),मृणाली जयवंत मोहिते (कामेरी),युवा सहभाग -प्रा.प्रज्ञा मधुकर विभुते(इस्लामपूर),जोडीदाराची विवेकी निवड – श्रीदेव गजानन साळुंखे(सांगली),विजय शामराव मोरे (भाटवाडी), अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिका कार्यवाह -डॉ सुनील पाटील (पाडळी), मानसिक आरोग्य व्यवस्थापन – मीनल घुले (इस्लामपूर),विज्ञान बोध वहिनी – सुधीर दाभाडे (शिराळा),सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग – दीपक खरात (आटपाडी),प्रेरणा सर्जेराव काळे (येलुर),समाज माध्यम व्यवस्थापन – प्रा.सुप्रिया कांबळे,(इस्लामपूर)
कायदेविषयक विभाग -ॲड.सुगंध मोहन वाघमारे (रामानंदनगर),विवेक वहिनी कार्यवाह – प्रा.डॉ.निता जोखे (शिराळा).यावेळी प्रा. डॉ.नितीन शिंदे,प्रा.डॉ.एस बी माने,महेश मोरे,प्रा.एल डी पाटील,एम.डी.जाधव,ॲड विक्रमसिंह मोहिते,मिलिंद भोसले,अरविंद कांबळे,शंकर शेलार उपस्थित होते.












































































