Last Updated on 09 Mar 2025 3:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने #मुंबई शहरातील रवींद्र नाट्यमंदीर येथे ‘शिवदुर्गा’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात त्यांनी बोलताना ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी दिली. लाडकी बहीण योजना बंद करणार असे विरोधक म्हणत असले तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून मिळणाऱ्या दरमहा १५०० रुपयांमधून नव्याने व्यवसाय करणाऱ्या आणि व्यवसायात विस्तार करणाऱ्या प्राजक्ता संदेश पाटील, सुजाता प्रमोद गायकवाड, पुजा प्रदीप सावंत, पुजा गणेश तारे, प्रिती प्रसाद शिंदे या कतृत्ववान महिलांना साडी चोळी आणि सन्मानचिन्ह देऊन यासमयी शिवदुर्गा सन्मानाने गौरवले.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी सौ.वृषाली शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महिला नेत्या मीनाताई कांबळी, आमदार डॉ.मनीषा कायंदे, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, प्रवक्त्या शायना एनसी, संध्या वढावकर, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार सदा सरवणकर यांसह महिला पदाधिकारी आणि असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्... Read more












































































