Last Updated on 23 Jul 2024 11:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 66.17 टीएमसी इतका झाला आहे.
धरणाचा पायथा वीजगृहाचे १ युनिट कार्यान्वित करून त्याद्वारे नदीपात्रात १०५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. लवकरच दुसरे युनिट सुरू करून हा विसर्ग २१११ करण्यात येणार आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर धरणाच्या ६ वक्र दरवाजांना पाणी टेकणार आहे. धरण परिचालन सूचीप्रमाणे धरणाचे दरवाजे उघडून जलपातळी नियंत्रित केली जाणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस झालयामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.मंगळवारी सायंकाळी पाच पर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 61 मिलिमीटर, नवजा येथे 37 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 58 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी आठ नंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 66.17 टीएमसी इतका झाला असून धरण 62.87 टक्के भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 693 क्युसेस इतकी सुरू आहे. गतवर्षी कोयना धरण 37.36 क्षमतेने भरले होते. यंदा मात्र पाणलोट क्षेत्रात वरूणराजाची दमदार बरसात सुरू आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 793 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 265 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 702 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 23/07/2024, Time: 05:00 PM
Water level: 2125’07” (647.878m)
Dam Storage:
Gross: 66.17 TMC (62.87%)
Live: 61.05 TMC (60.97%)
Inflow : 49,452 Cusecs.
Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 61/2793
Navaja- 37/3265
Mahabaleshwar- 58/2702









































































