Last Updated on 25 Apr 2023 4:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपुर येथील संत गजानन महाराज ट्रस्टच्या अध्यक्षपदी अॅड.दिग्विजय दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ट्रस्टच्या सदस्य मंडळाच्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षपदी अॅड.दिग्विजय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.नूतन अध्यक्ष अॅड.पाटील हे सध्या वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे सचिव,वाळवा तालुका विधी सेवा समितीचे सदस्य आहेत.विधी सेवा समितीच्या माध्यमातून तालुक्यात घेण्यात आलेल्या शिबिरात ते हिरीरीने पुढाकार घेत आहेत.
इतर कार्यकारिणी अशी :
उपाध्यक्ष : कृष्णाजी वसंतराव पत्की
सचिव : अॅड.नंदकुमार भगवान पाटील
विश्वस्त असे :सुनील राजाराम पाटील,संभाजी दिनकर पाटील,संतोष लक्ष्मण जाधव,श्रीमती रंजना अरुण पाटील,श्रीशैल पांडुरंग चव्हाण,तानाजी यशवंत पाटील,अभियंता दत्तात्रय शामराव माने,श्रीपाद काशिनाथ कुलकर्णी,संजय सदाशिव पाटील












































































