Last Updated on 03 Oct 2023 3:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तीन-चार महिन्यापासून रखडले आहे.मानधन घेणारे लाभधारक विधवा,वयोवृद्ध,दिव्यांग या व्यक्ती असतात.शासनाकडून मानधन बँक खात्यात जमा केलेले नाही.त्यामुळे त्यांना जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.मानधन वेळेवर बँक खात्यात जमा करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन रयत क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा संजय गांधी निराधार योजनेचे माजी वाळवा तालुका अध्यक्ष भास्कर कदम व प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप माने यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे तहसीलदार प्रदीप उबाळे,नायब तहसीलदार विनायक महाजन,महसूल सहाय्यक बी.एम कदम यांना देण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासो पाटील,रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले,रयत क्रांती संघटनेचे सुनील सावंत,रयत क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते जयवंत पाटील,रयत क्रांती संघटनेचे सरचिटणीस संदीप फार्णे,सामाजिक कार्यकर्ते सुदाम पाटील,येवलेवाडीचे उपसरपंच राजेंद्र जगताप,रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की,लाखोच्या घरात उत्पन्न असणाऱ्या आजी-माजी आमदारांचे अंदाजे 70 ते 80 हजार रुपये असणारे मानधन वेळेवर बँक खात्यात जमा होते.याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गतिमान अच्छे दिन सरकार म्हणावयाचे वाटते.मात्र संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये एवढे कमी असते.त्यांना महिन्याकाठी 1 हजार रुपये तूटपुंजे मानधन मिळते.या मानधनवर ते कसेबसे त्यांचे जीवन जगत आहेत. तरी देखील या गरीब लोकांचे गेले तीन-चार महिने झाले मानधन बँक खात्यात जमा नाही.याला गतिमान सरकारचे अच्छे दिन सरकार कसे म्हणावे याचे आश्चर्य व खेद वाटते.
हेही वाचा – ‘संस्कारक्षम बोधामृत’ : कर्माचा सिध्दांत
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन महिन्याकाठी,महिन्याच्या वेळेवर दुर्लक्ष न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून बँक खात्यात जमा करावे.व उर्वरित राहिलेले तीन ते चार महिन्यांचे मानधन बँक खात्यात चार दिवसात जमा करावे. अन्यथा महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर मोर्चे आंदोलने होतील.होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नागराज चांदकोटी,कुमार मोरे,प्रदीप नायकल,वंदना सूर्यवंशी,शोभा भोपाळे,उत्तम पाटील,अनिल नलवडे,नागराज कुंभार,रखुमाई जोगळे,नंदा साळुंखे,संकेत खामकर,रियाज मुजावर,महादेव पाटील,शशिकांत कामदमे,संतोष थोरात,विश्वास लके,शक्ती गणगटे,बाळकृष्ण पवार,अशोक सोनवणे,उत्तम पाटील यांच्यासह विधवा,वयोवृद्ध,दिव्यांग बांधव उपस्थित होते.







































































