Last Updated on 03 Feb 2023 10:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा | कृषि विषयक २५ पेक्षा अधिक योजनांचा लाभ महाडिबीटी पोर्टलद्वारे शेतक-यांना ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे.शेतक-यांना महाडिबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज करण्यापासून अनुदानाचा लाभ मिळेपर्यंत https://mahadbtmahait.gov.in/Farmer/login/login या URL चा उपयोग केला जात होता.
परंतु महाडिबीटी पोर्टलवरील तांत्रिक कारणास्तव पोर्टलच्या URL मध्ये बदल करण्यात आलेला आहे. नवीन URL https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login याप्रमाणे राहील.
तरी जिल्हयातील शेतकऱ्यांनाआवाहन करण्यात येते की, नवीन URL वरील महाडिबीटी पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना या सदराखाली विविध लाभाच्या घटकांसाठी नोंदणी करावी असे आवाहन संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.










































































