Last Updated on 26 Aug 2024 1:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पुणे येथे पार पडली. या बैठकीत विविध विषयांवरील महत्वाचे ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह सोयाबीन आणि साखरेचा, कापसाच्या हमीभावाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
या बैठकीस राज्यभरातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सध्या रयत क्रांती संघटनेच्या आणि पक्षाच्या सर्व आघाड्या बरखास्त करण्यात आलेल्या असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये माझा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आलेला असून दौऱ्या दरम्यान तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर मुंबई येथे होणारे महामेळाव्यात “प्रदेशाध्यक्ष” पदाची नेमणूक करण्यात येईल, असे बैठकीत ठरवण्यात आले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर विचार मंथन करण्यासाठी भविष्यात कार्यकर्त्यांची ‘अभ्यास शिबिरे’ देखील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला आघाडीकडून कार्यकर्त्यांना राखी बांधून रक्षाबंधन देखील साजरा करण्यात आले. विधान परिषदेवर नुकतेच आमदार म्हणून निवडून गेल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटनेकडून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.













































































