Last Updated on 15 Jul 2023 7:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून क्रीडा पुरस्काराची नावे जाहीर केली.
जीवन गौरव पुरस्कार
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन 2019-20 श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे),सन 2020-21 दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन 2021-22 आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.
आर्चरी
साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे हिला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे.आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणा-या स्नेहलला सन 2019-20 या कालावधीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.बहे (सांगली) येथील मयूर सुधीर रोकडे याला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे.आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणा-या मयूरला सन 2021-22 या कालावधीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्रीडा संस्कृतिचा वारसा
गिरीश महाजन म्हणाले,राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार
राज्यातील क्रीडा महर्षी,मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.राज्य सरकारने आज गेल्या तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार आज जाहीर केले.सन 2019-20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ठाण्याचे श्रीकांत शरदचंद्र वाड यांना,तर 2021-22 चा जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे.तीन वर्षातील एकूण 116 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
विविध पुरस्कार पुढीप्रमाणे
| पुरस्काराचे नाव | पुरस्कार संख्या |
| शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार | 2 |
| उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक | 13 |
| जिजामाता पुरस्कार ( क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ) | 1 |
| शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ) | 81 |
| शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार | 5 |
| शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) | 14 |
| एकूण | 116 |















































































