Last Updated on 03 May 2023 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे मौ. उदगांव येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी येणारा 146 कोटी 22 लाख रुपयांचा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येईल.
या मनोरुग्णालयास रत्नागिरीच्या प्रादेशिक रुग्णालयाच्या पदांप्रमाणे पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी याठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये असून, त्यात 5 हजार 695 मनोरुग्णांना भरती करता येते. अंबेजोगाई येथे 100 खाटांचे वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र स्थापन केले असून, जालना जिल्ह्यात 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापण्यात येणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते.त्यामुळे मौजे उदगाव (ता. शिरोळ) प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वपूर्ण निर्णय असे
👉 कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती.
👉 घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प सर्व शहरांमध्ये राबविणार.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य.
👉 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.
👉 शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.
👉 करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय









































































