Last Updated on 09 Aug 2023 8:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उद्योजक अनिल पाटील उर्फ चिमाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
सांगली । शिरटे (ता. वाळवा) येथे अनिल पाटील उर्फ चिमाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार,दि.12 ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी व निदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनिलभाऊ पाटील गौरव समितीच्या वतीने देण्यात आली.
अनिलभाऊ पाटील उर्फ चिमाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यसेवा हिच ईश्वरसेवा हेच प्रमाण मानून श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमप्रिय शिष्य श्री. चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज आमचे गुरुवर्य वे.शा.सं. श्री. अण्णु महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभाशिर्वादाने अनिलभाऊ पाटील गौरव समिती शिरटे यांच्या वतीने हे आरोग्य तपासणी व निदान महाशिबिर होत आहे.
हेही वाचा – विविध कार्यकारी सोसायट्यांना करता येणार ‘हे’ उद्योग,व्यवसाय; जाणून घ्या
कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध ट्युलिप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ् डॉक्टर डॉ. दिपक देशपांडे (ऑर्थो सर्जन व स्पाईन सर्जन) डॉ. संदीप पाटील (एम.डी. मेडिसिन, हृदयरोग तज्ञ) व डॉ. राजाराम पाटील (फॅमिली फिजिशियन आणि सर्जन) तसेच गंगा प्रकाश हॉस्पिटलचे फुफ्फुस रोग तज्ञ डॉ.एस. प्रकाश (M.B.B.S.M.D. Pulmonary Mrd.) व जनरल मेडिसीन डॉ. प्रकाश दिक्षित (M.B.B.S.) व डॉ. पी. आर. पाटील (P.R.O.) व डॉ. यशवंत पाटील यांच्या प्रदीर्घ अनुभवी वैद्यकीय सेवेतून शिरटेतील गरजू रुग्णांचे व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
शनिवार,दिनांक 12 ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत मारुती मंदीर चौक,शिरटे येथे होणाऱ्या या आरोग्य तपासणी व निदान महाशिबिराच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय तपासण्या खालीलप्रमाणे…
हाडांचे आजार – मशीनद्वारे हाडांचा ठिसूळपणा,दुखणे तपासणी,निदान व शस्त्रक्रिया
■ ब्लड प्रेशर तपासणी व निदान
■ रक्त लघवी तपासणी व निदान
■ हृदयरोग तपासणी व निदान
■ पी.एफ.टी. तपासणी व निदान
■ रक्तातील साखर तपासणी व निदान व्हायरल इन्फेक्शन तपासणी व निदान
■ फुफ्फुस रोग धाप लागणे, दमा, अस्थमा, टीबी, मधुमेह,
■ मुतखडा निदान व शस्त्रक्रिया
■ डायलेसिस ब्रोंकोस्कोपी, क्रिटिकल केअर ■ पोट विकार व जनरल सर्जरी
■ कॅन्सर निदान व शस्त्रक्रिया
सदर महाशिबीरामध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना मोफत शस्त्रक्रिया सुविधा दिल्या जाणार आहेत.महाशिबिरांमध्ये सर्व नामांकित कंपन्यांची औषधे अनिलभाऊ पाटील गौरव समिती,शिरटे यांचे वतीने मोफत देण्यात येणार असल्याची माहिती अनिलभाऊ पाटील गौरव समितीच्या वतीने देण्यात आली.










































































