Last Updated on 09 Jun 2023 6:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रकाश इन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायन्स (एम.बी.बी.एस.) मध्ये व्दितीय पदवी प्रदान कार्यक्रम
सांगली । जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये झपाट्यााने बदल होत चालला आहे,प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे, वैदयकीय क्षेत्राच्या सेवेमध्ये नवनविन तंत्रज्ञान येऊ लागले आहे. इतर क्षेत्रात व्यवसाय म्हणुन पाहिले जाते मात्र वैदयकीय सेवेच्या क्षेत्रात व्यवसाय म्हणुन पाहुन चालणार नाही,डॉक्टर व वैदयकीय सेवेमध्ये काम करणारा प्रत्येक घटक हा खर्या अर्थाने प्रत्येकासाठी परमेश्वर आहे.या परमेश्वराच्या हातुन प्रामाणिक सेवा होणे आवश्यक असल्याचे मत कॉसमॉस बॅकेचे चेअरमन व ऑल इंडिया बॅक फेडरेशन चे संचालक मिलिंद काळे यांनी व्यक्त केले.

उरूण-इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण फौंडेशन संलग्नीत प्रकाश इन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायन्स (एम.बी.बी.एस.)च्या व्दितीय पदवी प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रसिध्द दयरोग तज्ञ डॉ. महादेव दिक्षीत हे होते.यावेळी प्रकाश शिक्षण,आरोग्य व उद्योग समुहाचे संस्थापक व भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मिलिंद काळे पुढे म्हणाले,देशाच्या प्रगतीमध्ये जसे इंड्रस्ट्रीज मोठे योगदान आहे,तसे वैदयकीय क्षेत्राचे ही आहे पण इंड्रस्ट्रीजकडे व्यवसाय म्हणुन पाहिले जाते, वैदयकीय क्षेत्राकडे व्यवसाय म्हणुन पाहुन चालणार नाही. यामध्ये व्यवसायीकता आली तर आपल्याकडे नागरीकांचा पाहाण्याचा दृष्टीकोण बदलेल,डॉक्टरांच्याकडे परमेश्वर म्हणुन पाहिले जाते,तुम्ही खर्या अर्थाने भाग्यवान आहात,एम.बी.बी.एस. सारखी मोठी पदवी मिळवुन रुग्णांची सेवा करुन त्यांच्या वेदनेवर व दु:खावर फुंकर मारुन त्या रुग्णाचे व त्याच्या नातेवाईकांचे अश्रु पुसण्याचे काम तुमच्या हातुन होणार आहे.अनेकांना आपण केलेल्या उपचारामुळे जीवदान मिळणार आहे,असे अनेक भाग्याचे क्षण फक्त तुमच्या आयुष्यात यापुढे येणार आहेत.ज्यांनी तुम्हांला घडविले त्या आई-वडील,अध्यापक व ज्ञान दिलेल्या प्रकाश शिक्षण फौंडेशनला कधी ही विसरु नका.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. महादेव दिक्षीत म्हणाले, वैद्यकिय सेवेच्या क्षेत्रामध्ये काम करणार्या डॉक्टर व सहकारी स्टाफकडे समाजाने बघण्याचा द़ृष्टीकोन बदलला पाहिजे. कोरोनासारख्या संकट काळात आपल्या कुटुंबापासुन बाजुला राहुन अनेक रूग्णांना सेवा देवुन त्यांना जीवदान दिले. या संकट काळात डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची व कुटुंंबाची पर्वा केली नाही. यामध्ये अनेक डॉक्टरांचे व सहकारी स्टाफचेही जीव गमवावे लागले. अनेक रूग्ण, नातेवाईक व समाजातील विकृत विचाराच्या लोकांनी या संकट काळात स्वत:चा जीव धोक्यात घालुन लढणार्या डॉक्टर व हॉस्पिटल दालनावरती चुकिचे बेकायदेशीर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले. याची खंत मनामध्ये कायम राहिल. प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर येथे अनेक कोरोना रूग्णांच्यावर यशस्वी उपचार झाले. या हॉस्पिटलचे कोरोना संकट काळात मोेठे योगदान आहे हे विसरता येणार नाही.भविष्यातला भारत आरोग्य द़ृष्टया सक्षम करायचा असेल तर आरोग्य सेवा देणार्या डॉक्टर्स व सहकारी स्टाफ यांची सुरक्षितता व कायदा महत्वाचा आहे.
प्रकाश शिक्षण, आरोग्य व उद्योगसमुहाचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, इस्लामपुर सारख्या निम शहरी भागात मेडिकल कॉलेज सूरू करता आले यामुळे महाराष्ट्रातील अनेक कानाकोपर्यातुन विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी या शहरात येवु लागले. त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबर समाजसेवक व उत्तम नागरिक घडविण्यासाठी प्रकाश इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च काम करत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ वैद्यकिय क्षेत्रातील ज्ञानदान व उपचार देणारे एक सक्षम शहर म्हणुन भविष्यात या शहराची ओळख निर्माण करण्याचा आमचा माणस आहे. केारोनाच्या काळात प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातुन अनेक रूग्णांना जीवदान देता आले. चांगल्या सेवेबद्दल महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून कौतुकचे संदेश आले याच खरं श्रेय डॉक्टरांपासुन हॉस्पिटलमध्ये साफ सफाई करणार्या कर्मचार्यांना जाते. आजच्या विद्यार्थी पदवी घेवुन बाहेर पडत असताना त्यांनी व्यावसायिकता न जपता कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवुन रूग्णांच्यावर उपचार करावेत जेणेकरून रूग्ण व नातेवाईकांना परमेश्वर या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहिल्यावर समजेल.

स्वागत-प्रास्ताविक डॉ. बी.के. पाटील यांनी केलेे. सुत्रसंचालन व आभार ईशा पावसकर यांनी केले. यावेळी प्रकाश शिक्षण फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव, प्रकाश पब्लिक स्कुलच्या प्रशासिका सुनिता भोसले-पाटील, प्रकाश इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरचे आधिष्ठता डॉ. सी.एस.कांताराज, कॅम्पस डायरेक्टर डॉ. विजय पाटील, प्रकाश हॉस्टिल अॅण्ड रिसर्च सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. भुपाल गिरीगोसावी, मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रदिप कुलकर्णी, डॉ. रोहिणी करंबेळकर, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. अविषेक कुमार, डॉ. जयदिप पाटील, डॉ. सुनिल खारगे, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, वाळवा तालुका भाजपाचे सरचिटणीस दादासाहेब रसाळ व यदुराज थोरात, हिम्मत जाफळे, किशोर खंडागळे, सचिन मोरे आदीसह अन्य मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.












































































