Last Updated on 08 Jan 2024 8:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच जागरूक राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी केले.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित मालती वसंतदादा पाटील प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने राजारामबापू पाटील नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.शाळेचा वार्षिक आढावा ऐकल्यानंतर शाळेविषयी व शिक्षकांविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील होते,
प्रमुख निमंत्रित म्हणून डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज,कराडचे प्राचार्य डॉ ए एम मुल्ला,टिळक हायस्कूल कराडचे पर्यवेक्षक शरद शिंदे,प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रमेश पाटील,शिक्षक समिती पलूसचे अध्यक्ष प्रदीप मोकाशी, दै.पुढारी समूह कराडचे सतीश मोरे,नगरसेवक अयुब हवलदार, नगरसेविका ॲड.कोमल बनसोडे,प्राचार्या सौ शीतल पाटील उपस्थित होत्या.
स्वागत व प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ इरफाना संदे यांनी सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाचा हेतू सांगून पाहुण्यांची ओळख करून दिली, संस्थेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत विविध स्पर्धात्मक पातळीवर शाळेचा नावलौकिक जिल्हाभर कसा वाढवला आहे याविषयी आढावा सांगितला,
अध्यक्षीय भाषणात ॲड धैर्यशील पाटील यांनी शाळा आणि समाज यामध्ये उत्तम दुवा साधण्याचे काम शिक्षकांनी केल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.उपस्थित निमंत्रितांनी आपली मनोगते व्यक्त केली.शाळेचा वार्षिक अहवाल व्हिडिओ क्लिपद्वारे दाखवण्यात आला तर बालचिमुकल्यांनी विविध गुणदर्शनाच्या उत्तम कलाकृती पाहुण्यांच्या पुढे सादर केल्या.पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह होता.सूत्रसंचालन प्रा.विजयकुमार शिंदे यांनी तरआभार सौ. स्वाती क्षीरसागर यांनी मानले.











































































