Last Updated on 13 Oct 2024 3:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शिरटे, लवणमाची, बिचुद येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदारांकडे विकास कामांसाठी निधी मागण्यास गेल्यावर जनतेला ते राज्यात व केंद्रात आमचे सरकार नाही, महायुती सरकार आम्हाला निधी देत नसल्याचे करण ते देतात. मग महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून आणलेल्या निधीचे श्रेय घेण्यासाठी मोठं-मोठे बॅनर लावून तोच निधी ‘मीच’ मंजूर करून आणल्याचा केविलवाणा प्रयत्न ते का करतात, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी उपस्थित केला.
शिरटे येथे ७ कोटी १० लाख, लवणमाची येथे ४ कोटी ५१ लाख, बिचुद येथे ५४ लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, सीतादेवी हे जागृत देवस्थान आहे. तसेच ते पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मी स्वतः दि. ३ जुलै २०२४ रोजी पालकमंत्री ना.डॉ.सुरेश खाडे यांच्यामार्फत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. हे सरकार महायुतीचे आहे. या सरकारच्या माध्यमातून या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु येथील विद्यमान आमदार मोठं-मोठे बॅनर लावून तो निधी मीच आणल्याचा कांगावा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु येथील जनता शहाणी आहे. ती तुमच्याकडे गेल्या १२ वर्षापासून मंदिराच्या विकासासाठी निधीची मागणी करत होती. मग तुम्ही याप्रश्नी आजपर्यंत गप्प का होता. याचे उत्तर त्यांनी द्यावे.
यावेळी शिरटे येथे जयश्रीताई रणदिवे, दिलीप लाड, जालिंदर देसाई, बाळासो देसाई, सुनील पाटील, सुभाष तांबवेकर, उद्योजक रुपेश देसाई, हरी खोत, जयवंत देसाई, दत्तात्रय मालेकर, जयवंत लाड, श्रीपाद मालेकर, दीपक लाड, राहुल डोळस तर बिचूद येथे सरपंच साधना पाटोळे, राहुल मोहिते, शंकर जाधव, सुनीता रसाळ, उपसरपंच शोभाताई रसाळ, शिरीषकुमार रसाळ, माजी सरपंच अशोक पाटील, संदीप पाटोळे, नंदकुमार मोहिते, विकास तांदळे, दत्तात्रय माने, विलास मोहिते, रमाकांत कुलकर्णी, अक्षय रसाळ, गणेश मोहिते, दत्तात्रय कोळी, पांडुरंग भोसले, राजेंद्र गुरव, दादासाहेब सोनवणे, वसंत कुदळे व लवणमाची येथे उपसरपंच रामराव सरोदे, शिवराज रजपूत, विजय दुर्गावळे, जयवंत जाधव, मनोहर दबडे, शरद साळुंखे, महादेव डिसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेबांचे एकाच गावात चार गट..
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदारांनी गेले ३५ वर्षे मतदार संघाचा विकास कमी पण आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच गावात चार गट करण्यावर भर दिला. परंतु त्यांच्या भूमिकेमुळे तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणूस भरडला गेला. गावातील गटा-तटाच्या राजकारणामुळे खऱ्या अर्थाने अनेक गावांचा विकास खुंटला गेला, असेही निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.









































































