Last Updated on 03 Jul 2025 10:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांना निवेदन
नवी दिल्ली । वाळवा तालुका काँग्रेस समितीची जागा व इमारत ताब्यात घेण्याबाबतचे निवेदन वाळवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्ली येथे दिले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस युवक सचिव विजय पवार उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मौजे इस्लामपूर येथे बांधलेल्या इमारतीची जमीन शहर सर्वेक्षण क्रमांक ४४५१ क्षेत्रफळ ३५०.१५ चौ.मी. हा परिसर इस्लामपूर नगरपरिषद मिळकत क्रमांक ०५११०००२७८ च्या मालकीचा आहे आणि १८७०.०८ चौ.मी. आहे. बांधकाम आणि खुल्या जागेसह संपूर्ण मालमत्ता अध्यक्ष तालुका काँग्रेस समिती वाळवा यांच्या मालकीची आणि भोगवटाची आहे. सदर मालमत्ता अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी वाळवा यांच्या मालकीची आणि ताब्यात होती आणि आहे. ही जागा ३ जून १९५९ रोजी खरेदी करण्यात आली होती. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक २०२४ च्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने, काँग्रेसच्या मालकीची मालमत्ता विकण्यास सांगण्यात आले आहे.
ही मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या मालकीची नाही. राष्ट्रवादी ने १९७८ पासून काँग्रेस च्या मालकीच्या मालमत्तेवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून, कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय, काँग्रेस पक्षाच्या जागा इमारतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यालयाच्या नावाचा फलक लावून बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. काँग्रेसच्या कोणत्याही परवानगीशिवाय पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मालमत्तेवर कब्जा केला आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit नियमावलीचे पालन करणे बंधनकारक सांगली | सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हाद... Read more













































































