Last Updated on 24 Jan 2024 1:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य शिबिरात तपासणी व उपचार केलेल्या रुग्णांचा आकडा 10 हजारच्यावरती गेलेला आहे.आतापर्यंत 10 गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे पार पडली असून 28 जानेवारीपर्यंत आणखी 5 आरोग्य शिबीरे होणार आहेत. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या शिबिरां चे संयोजन करीत आहेत. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांचा या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोर-गरीब व गरजू रुग्णांना मोफत अद्यावत सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याने रुग्ण व नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत.
वाळवा व मिरज तालुक्यातील बोरगाव 846,येडेमच्छिंद्र 1073, वाळवा 1152, बावची 975,बागणी 1099, कवठेपिरान 997,कसबे डिग्रज 843,कासेगाव 949,नेर्ले 1240, वाटेगाव 810 या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही आरोग्य शिबिरे पार पडली आहेत.
या शिबिरात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 10-12 गावेही सहभागी झाली आहेत. या शिबिरात सर्वरोग तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत. या शिबिरात ज्यांना पुढील शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे,त्यांची शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली आहे. या शिबिरात डोळे तपासलेल्या नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहेत.
प्रतिकदादा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून या आरोग्य शिबिरातून गोर-गरीब व ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अद्यावत सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते स्वतः बहुतेक गावातील आरोग्य शिबिरांना भेटी देऊन कमी-जास्त बघताना आरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशीही करीत आहेत. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी स्व.बापूंच्या अकाली निधना नंतर 1985 पासून ही आरोग्य शिबिरे सुरू करून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सोई-सुविधा दिल्या आहेत. आतापर्यंत सांगली जिल्हा व वाळवा तालुक्यातील लाखो रुग्णांना या शिबीरांचा लाभ झाला आहे.
कराड येथील कृष्णा हॉस्पिटल,सिनर्जी (मिरज),सेवासदन (मिरज),आष्टा क्रीटी केअर,स्पंदन (आष्टा),जयंत नेत्रालय (इस्लामपूर),सुदर्शन (सांगली) आदी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या शिबिरात रुग्ण तपासणी व उपचार केले.
धनाजी लोहार या ८ वर्षाच्या बालकावर तातडीने छोटी शस्त्रक्रिया
धनाजी दिलीप लोहार या ८ वर्षाच्या बालकाच्या दाढेखाली गाठ होती. त्याच्या आई-वडिलांनी खाजगीत उपचार करूनही मात्र त्रास कमी झाला नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये छोट्याशा शत्रक्रियेचा खर्च ५० हजार सांगितला होता. त्यांची आर्थिक धनाजी चे आई-वडील त्याला बोरगाव च्या शिबिरात घेऊन आले. त्याच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मोफत यशस्वी उपचार करण्यात आले. त्याच्या आई-वडीलांनी प्रतिकदादा व सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.









































































