Last Updated on 04 Sep 2024 4:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आजच्या धावपळीच्या युगात ताण- तणावाखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे,समाजात सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्याचे काम रिल्स स्टार्स करीत आहेत. रिल्स स्टार्स ना सर्वत्र मान्यता मिळत असून आपणही काही रिल्स स्टार्सना फालो करतो,अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राजारामनगर (ता.वाळवा) येथे राज्या तील नामवंत रिल्स स्टार्सचा ‘जयंत कला सन्मान’ आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिक दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य रिल्स स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. आ. सुमनताई पाटील,युवा नेते प्रतिकदादा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,नेर्लेचे सरपंच संजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,सोशल मिडीयाचे तालुकाध्य क्ष सुशांत कोळेकर,उपाध्यक्ष विशाल माने, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटुगडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी स्व.बापूंच्या प्रतिमेचे पूजन,दीपप्रज्वलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील नामांकित रिल्स स्टार राहूल पाटील,अनिकेत शिंदे,वैभव गावडे,मराठी बिग बॉस फेम धनंजय पवार यांचे वडील अजित पवार,महेश गुरव,विशाल भानुसे,नेहा थोरात यांच्यासह अनेक नामवंत रिल्स स्टार्स चा सन्मान करण्यात आला. तसेच रिल्स स्पर्धेतील प्रथम संचिना गणेश हारपुडे,द्वितीय ऐश्वर्या महेंद्र शेलार,तृतीय अविनाश ज्ञानेश्वर उगळे,आणि उत्तेजनार्थ विजेते अस्लम शेख, शुभम जांभळे,गौरी गोडस,साहेबराव रणशिंगे,रोहन लालुगडे यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी राज्यातून आलेल्या रिल्स स्टार्सनी आ.जयंतराव पाटील यांच्याशी विविध मुद्द्यावर अगदी मनमोकळा संवाद साधला.
प्रारंभी सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रेयस चिवटे,प्रतीक पाटील,रविकिरण बेडके,शंकर पाटील,उमेश देसाई,सागर पाटील,सौरभ सावंत,शरद अहिर,शुभम माने, राहुल पाटील,आसिफ मुल्ला,जगन्नाथ पाटील,आकाश दवणे,सौरभ मोटे,अमित कुमार हुजरे,संतोष बाबर,सागर फारणे, शशिकांत दगडे,अमित पाटील,हणमंत सूर्यवंशी,किरण खोत,विशाल माने,सरफराज इनामदार,सत्यजित डोंबाळे यांच्यासह मान्यवर व रिल्स स्टार्स उपस्थित होते.तालुका उपाध्यक्ष विशाल माने यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचलन केले.










































































