Last Updated on 16 Feb 2023 7:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाढदिनी दिला हार-तुरे व भेट वस्तुंना फाटा; स्विकारल्या संवादरुपी शुभेच्छा
सांगली । माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी वाढदिनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळा परिसरात दिवसभर थांबून हार-तुरे व भेट वस्तुंना फाटा देत संवादरुपी शुभेच्छा स्विकारल्या.यावेळी तालुका,जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला.विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,खा.प्रफुल्ल पटेल,गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई,पालकमंत्री सुरेश खाडे,माजी मंत्री धनंजय मुंडे,माजी आ.प्रकाश गजभिये,आ.अनिल भाऊ बाबर,श्रीमती जयश्री पाटील,अभिजित अवर्सेकर,सोहम शिरगावकर यांच्यासह राज्यातील मान्यवरांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती.
आ.पाटील हे सकाळी 10 वाजता स्व.बापूंच्या पुतळा परिसरात आले.प्रथम त्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्याचे दर्शन घेवून शुभेच्छा स्विकारण्यास सुरुवात केली. माजी आ.विलास लांडे,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,रविकांत वरपे,सुनील गव्हाणे,श्रीकांत लांडे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती आणि तुलसी हार घालून शुभेच्छा दिल्या.येथे तालुक्यातील लोकांच्यासाठी चार,तसेच बाहेरून आलेले मान्यवर व महिलांच्यासाठी प्रत्येकी एक मंडप उभारला होता. आ.जयंतराव पाटील प्रत्येक मंडपात जाऊन शुभेच्छांचा स्विकार करीत होते.यावेळी सर्वांच्या अल्पोहाराची व्यवस्था केली होती.

आ.जयंत पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना विलास लांडे,मेहबूब शेख,रविकांत वरपे, सुनील गव्हाणे,श्रीकांत लांडे व मान्यवर
खा.श्रीनिवास पाटील,माजी मंत्री शिवाजीराव नाईक,आ.मानसिंगभाऊ नाईक, आ.अरुण लाड,डॉ.सुरेश भोसले,इंद्रजित देशमुख,माजी आ.सदाभाऊ पाटील,माजी आ.राजीव आवळे,दीपकआबा साळुंखे, बाबासो वाघचौरे,दत्ता गोरुड,कोल्हापूरचे ए.वाय.पाटील,बाबासो पाटील,अमरसिंह पाटील (शिरोळ),पालीचे देवराज पाटील, पी. आर.पाटील,दिलीपराव पाटील,माणिकराव पाटील,नेताजीराव पाटील,देवराज पाटील, भरत जाधव (नागपूर),महेंद्र लाड,बाळासाहेब पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, पृथ्वीराज पाटील,श्रीमती अनिता सगरे,सारंग पाटील, किसन जानकर,वैभव पाटील,वैभव शिंदे, अँड.बाबासो मुळीक, किरण लाड,पै.नामदेव मोहिते,सुखदेव पाटील,जतचे सुरेश शिंदे, कल्लाप्पा होर्तिकर, प्रकाश जमदाडे, रमेश पाटील, जि.प.सदस्य संजय पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नंदकुमार पाटील, आप्पासो कदम,संजय बजाज,पै.भीमराव माने,पै.राहुल पवार, भालचंद्र पाटील,धनपाल खोत,दत्ताजी पाटील, बाळासाहेब होनमोरे, जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,मालन मोहिते, सुरेखा लाड, रोझा किणीकर,कमल पाटील, आनंदराव नलवडे,सभापती दिनकर पाटील, सिकंदर जामदार,प्रमोद इनामदार,सतिश पाटील, शेखर माने,मैमुद्दीन बागवान,दिगंबर जाधव, अंनिसचे संजय बनसोडे,शेतकरी संघटनेचे महेश खराडे,भागवत जाधव,कॅप्टन वसंतराव अजमाने,तसेच राजारामबापू परिवारातील पदाधिकारी,संचालक, गावोगावचे सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,अधिकारी आणि जिल्हा व राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आ.जयंत पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना खा.श्रीनिवास पाटील. समवेत डॉ.सुरेश भोसले,संजय पाटील व मान्यवर
प्रा.शामराव पाटील,विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील,संजय पाटील,कार्तिक पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख, यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ठ संयोजन केले. संदीप तांबवेकर,प्रा.कृष्णा मंडले यांनी सूत्रसंचालन केले.
आ.जयंतराव पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कुकिंग या संस्थेच्या वतीने सम्राट पाटील,धैर्यशील पाटील यांनी 61 हजार रुपयांची आर्थिक मदत जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानला दिली.हा धनादेश अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे यांनी स्विकारला.












































































