Last Updated on 25 Nov 2024 8:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । अपेक्षेइतका मान्सून आणि काहीशी ऑक्टोबर हीट संपल्यानंतर आता थंडीकडे वाटचाल सुरु झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरल्यानं नागरिक काहीसे सुखावले आहेत.
तर येत्या काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
सणासुदीनंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानं धामधुमीची जागा आता व्यायाम, आरोग्यपूर्ण आहार आणि पर्यटनाच्या उत्साहानं घेतली आहे. राज्यातील हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.











































































