Last Updated on 20 Jul 2022 8:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना सन 2020-21 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (मरणोत्तर) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती.

जीवन गौरव पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने शासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा कलावंतांना जीवनगाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.गेल्या २ वर्षांचे पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत त्यात ज्येष्ठ तमाशा कलावंत यंदा 2019-20 या वर्षासाठी आतांबर शिरढाेणकर यांना, तर 2020-21 या वर्षासाठी संध्या माने यांना शासनाने पुरस्कार जाहीर केले आहेत. रोख 5 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शानसातर्फे दिमाखदार साेहळ्यात हे पुरस्कार देण्यात येतो. तमाशा रसिकांच्या मनामनात स्थान निर्माण केलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने 2006 मध्ये ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केला.
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कार आणि वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कार देण्यात येणार असून “पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर” असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. किर्तन/ समाजप्रबोधन पुरस्कार दिला जाणार असून “ह.भ.प. शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव” असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना आता “राजर्षी शाहू महाराज” वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाईल.









































































